
अमळनेर– दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रोटरी क्लब अमळनेर तर्फे गणेश उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी एक छान फोटो गणपती बाप्पा सोबत या स्पर्धेचे आयोजन केले आहे.सदर फोटो रोटरी कडून दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचा आहे.
त्यासाठी रोटरी क्लब तर्फे 3 बक्षीस देण्यात येणार आहे.तरी या उपक्रमामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व घरात विराजमान बाप्पाची एक चांगल्यापैकी छान सेल्फी काढून १) 9665164000, २) 9922435481 व्हाट्सअप नंबर वर पाठवावा.सेल्फी स्वीकारण्याची अंतिम दिनांक 17-9-2024 पर्यंत आहे.असे आवाहन रोटरी चे प्रोजेक्ट चेअरमन योगेश येवले ,विजय पाटील, प्रेसिडेंट ताहा बुकवाला, सेक्रेटरी विशाल शर्मा यांनी केले आहे.




