
निर्माल्य जमा करून करताय खतांची निर्मिती
अमळनेर:-प्रत्येकाच्या घरात दररोज पूजाअर्चा केली जाते. रोज निर्माल्याची विल्हेवाट कशी लावावी, यासाठी लोकमान्य विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र निकुंभ व आशा निकुंभ यांनी निर्माल्य गोळा करण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अनेक नागरिक निर्माल्य इतरत्र फेकून देतात. यावर उपाय म्हणून पर्यावरणप्रेमी निकुंभ दांपत्य यांनी पुढाकार घेत निर्माल्य गोळा करण्याचा मानस व्यक्त केला. ज्यांच्याकडे निर्माल्य असेल त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी निर्माल्य गोळा केले. विशेष म्हणजे या निमित्ताने भेटही होऊन टी वुइथ यू हा नाती जोडो कार्यक्रमही सुरू केला आहे. जमा केलेल्या निर्माल्याचे माती विरहीत करून त्याची खत निर्मिती केली जाणार आहे. तरी ज्यांच्याकडे निर्माल्य असेल त्यांनी निकुंभ दांपत्यास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून निर्माल्य दान करावे, असे आवाहन राजेंद्र निकुंभ व आशा निकुंभ यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९४२३९०३२४५,८६२५९३००२२ यावर संपर्क साधावा.




