
अन्न व औषध प्रशासनाकडून ग्राहकांसह विक्रेत्यांना सूचना…
अमळनेर: गणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अधिक मागणी असलेल्या अन्नपदार्थात भेसळ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी काळजी घ्यावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन, जळगाव येथील सहायक आयुक्त म.मो. सानप यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मिठाई, खवा, मावा, नमकिन ई. पदार्थांना मागणी असते, त्यामुळे दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, व मिठाई यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नपदार्थ खरेदी करताना फक्त नोंदणी असलेल्या परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावी, तसेच यावेळी गणेश मंडळे, अन्न पदार्थ विक्रेते, व अन्न व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रार करण्यासाठी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




