अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे पोलीस ठाण्यात निवेदन
अमळनेर-खा.राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड, यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक करावी या मागणीचे निवेदन अमळनेर तालुका काँग्रेसच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
तसेच कर्नाटक राज्यातील घडलेली वस्तुस्थिती लपवून, फेक वृत्तांत प्रसिद्ध करत देशात दिशाभूल केली जात असल्याने अशा खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.सदर निवेदनात म्हटले आहे की बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीच्या विरोधात “राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाखाचे बक्षीस देईन असे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.तसेच कर्नाटकात झालेल्या घटनेची वस्तुस्थिती लपवून फेक वृत्तास, व्हाट्सअप व इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून प्रसिद्धी देऊन, जनतेची दिशाभूल करून, जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. सोशल मीडियावरील घटनेची लिंक व खोटी माहिती त्वरित काढण्यात यावी. आणि पुढील प्रसारण बंद करण्यात यावे अशी मागणी यात करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी,युवक जिल्हाध्यक्ष महेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे जिल्हा उपाध्यक्ष,वक्ता सेल जिल्हाध्यक्ष संदीप घोरपडे,माजी नगरसेवक राजू फाफोरेकर,जिल्हा सरचिटणीस गजेंद्र साळुंखे, सय्यद अजहर अली, तुषार संदानशिव,बन्सीलाल भागवत, रवींद्र पाटील,त्र्यंबक पाटील, प्रताप पाटील, लोटन पाटील, सईद तेली, हर्षल जाधव, ऍड. गिरीश पाटील, तौसिफ तेली, कैलास प्रल्हाद पाटील, रोहिदास पाटील, भूषण पाटील, आसिफ शेख, रोशन ठाकरे, कुणाल पाटील उपस्थित होते.