अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय,अमळनेर या ठिकाणी प्रताप महाविद्यालयाचे संस्थापक,आधारस्तंभ,कर्मयोगी,दानशूर, श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या 145 व्या जयंती निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी श्रीमंत प्रताप शेठजी व श्रीमती भागीरथीदेवी मोतीलालजी अग्रवाल यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले.
या प्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,जेष्ठ प्रा.जयंत पटवर्धन,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पराग पाटील,डॉ.विजय तुंटे,डॉ व्ही.बी.मांटे, डॉ.अमित पाटील,डॉ.योगेश तोरवणे,कुलसचिव राकेश निळे यांच्यासह सेवानिवृत्त प्रा.जे.सी.अग्रवाल,महाविद्यालयाचे क्रीडा संचालक अमृत अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर वृंद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी प्रताप शेठजी यांच्या एकूण कार्याचा संक्षिप्तपणे आढावा घेतला, प्रताप शेठजी यांनी केलेल्या बहुविध कार्याची प्रसंगीकता आजच्या संदर्भात प्रस्तुत केले याचप्रमाणे प्रताप शेठजी यांचे कार्य व निःस्वार्थ भूमिकेप्रमाणे आपण सतत वाटचाल केली पाहिजे, अशा पद्धतीचा संदेश प्राचार्य यांनी यावेळी दिला.