अमळनेर:- येथील भोई समाजातील रवींद्र शिंगाणे यांचे वयाच्या 42 व्या वर्षी आपत्कालीन निधन झाल्यामुळे एका गरीब महिलेस भोई समाज मदत केंद्र यांच्या वतीने 20 हजाराची आर्थिक मदत करून माणुसकीचा धर्म निभावला.
रुबीजीनगर भागातील भोई समाजातील l प्रमिला बाई शिंगाणे यांच्या निराधार कुटुंबास मदत केल्याने परिसराच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी धुळे येथील समन्वयक सतिष फुलपगारे, ज्ञानेश्वर जाधव,अमळनेरचे बापू भोई (पैलाड), संतोष शिंगाणे, मनोज शिंगाणे, विकी भोई, बंटी शिंगाणे, किरण तमखाने, जितू भोई, शिवम शिंगाणे, योगेश फुलपगारे, इत्यादी उपस्थित होते. या भागातील महिला भगिनी यांनीही आभार व्यक्त केले.