अमळनेर:- दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल तालुक्यातील गडखांब येथील योगेश्वरी पाटील हीचा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात येऊन धनादेश प्रदान करण्यात आला आहे.
माजी सैनिक व सध्या पोलीस दलात कार्यरत असलेले पंकज गुलाब पाटील (रा गडखांब) यांची कन्या योगेश्वरी पंकज पाटील हिने इयत्ता दहावीत 95% मिळवले होते. ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व रिटायर्ड मेजर डॉ. निलेश पाटील यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी २० हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्याच्या सन्मानाबद्दल तिचे व कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.