अमळनेर : ताडेपुरा भागातील महिला पोलिस दादागिरी व शिवीगाळ करीत असल्याची तक्रार तेथील महिलांनी केली असून लताबाई नवनाथ इंगळे या महिलेने याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे.
चेंडू घरात गेल्यावरून एकाने महिला पोलिसाचा विनयभंग केला म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या वादात महिला पोलिसाला समजावण्यास गेलेल्या महिलांना दादागिरी आणि शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार ताडेपुरा भागातील महिलांनी केली. महिलांनी पोलीस स्टेशन गाठून त्या पोलिसविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.