
अमळनेर:- तालुक्यातील पिळोदे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवडणुक झाली.
यात चेअरमनपदी अनिल प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमनपदी पुंडलिक रामदास कोळी यांची निवड करण्यात आली. संचालक शांताराम पारधी,पप्पु कुलकर्णी, राजु शिंदे ,बाळु पवार , संगीता पाटील ,भगवान निकुंभ,सुभाष पाटील, नितीन पवार, नरेंद्र पाटील, गोटु पाटील, निळकंठ पाटील, जिजाब पाटील, लोटन पाटील तसेच गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात हजर होते.




