
अमळनेर : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी नणंद व तिच्या प्रियकराला न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अवघ्या तीन तासात पोलिसांनी उलट तपासणीत आणि एलसीबीच्या मदतीने तांत्रिक बाबीच्या साहाय्याने मंगल घोगले व करण घटायडे हेच आरोपी असल्याचे निष्पन्न केले होते. करण याला त्याच दिवशी रात्री अटक करण्यात आली होती तर मंगल हिला सकाळी अटक करण्यात आली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्या. एलमाणे यांनी आरोपीना २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.




