अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तसेच प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नाशिक येथील डाटामॅटिक ग्लोबल सर्व्हिस ली. या कंपनीद्वारे मुलाखती संपन्न झाले. त्यासाठी कंपनीचे अधिकारी कमलेश चिचे,कुणाल घोटेकर, तेजस गायकवाड, किशोर सोनवणे,केतन सोनार आणि दिनेश वाडिले हे मुलाखती घेण्यासाठी आले होते. कॅम्पस मुलाखतीमध्ये बी.कॉम, एम.कॉम तसेच बीबीए अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
मुलाखती दरम्यान 63 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना महाविद्यालयाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला.सदर विद्यार्थ्यांचा सहा महिने परिविक्षाधीन कालावधी असेल त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार सेवेत कायम केले जाणार आहे. खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, जेष्ठ संचालक हरी भिका वाणी, प्रदिप अग्रवाल, योगेश मुंदडे तसेच चिटणीस व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. वाणिज्य विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.योगेश व्ही.तोरवणे तसेच IQAC चे समन्वयक डॉ.मुकेश भोळे, प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे सदस्य प्रा.संदीप बी नेरकर मुलाखती घेतांना उपस्थित होते. वाणिज्य विभागातील डॉ.ज्ञानेश्वर मराठे, डॉ.किरण भागवत, डॉ.किरण सूर्यवंशी, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.अनिल झळके यांनी सहकार्य केले.
प्रा.लुनकरण चोरडीया, प्रा.हर्षदा बाविस्कर, प्रा.कपिल मनोरे यांनी यावेळी समन्वयक म्हणून कार्य पार पाडले.