अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील शरद रघुनाथ पाटील यांनी २७ रोजी मंगरूळ जवळील सेंट मेरी शाळेसमोरील अजय केले यांच्या गोदामच्या खिडकीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.लक्ष्मण शंकर पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे ,संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.