अमळनेर:- तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत १०७ खटले निकाली निघाले असून सुमारे १ कोटी ८८ लाख ७८ हजार ७९३ रुपये वसूल करण्यात आले आहेत.
एकूण चार पॅनल समोर ७४ प्रलंबित तर ३३ वादपूर्व खटल्याचा निकाल लागला. पॅनेलमध्ये तदर्थ न्यायाधीश सी व्ही पाटील , ऍड जे यु बडगुजर , पॅनल पंच ऍड जे यु बडगुजर , वरिष्टस्तर दिवाणी न्यायाधीश पी पी देशपांडे , पंच ऍड डी डी महाजन , कनिष्टस्तर दिवाणी न्यायाधीश एस एस जोंधळे , पंच ऍड चेतना पाटील , कनिष्टस्तर सह दिवाणी न्यायाधीश ए यु यादव ,पंच ऍड आर पी देशपांडे यांनी काम पाहिले.लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ऍड यज्ञेश्वर पाटील ,उपाध्यक्ष ऍड नंदलाल सूर्यवंशी , सचिव ऍड जितेंद्र साळी , ऍड व्ही डब्ल्यू वाणी , ऍड जी वाय विंचूरकर , ऍड के व्ही कुलकर्णी , ऍड किशोर बागुल यांचे सहकार्य केले.