
अमळनेर:- प्रदीर्घ सेवेनंतर अमळनेर शहरातील पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल नंदवाळकर ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांनी दिलेल्या सेवेचा सन्मान म्हणून त्यांची सन्मानपूर्वक मिरवणूक बग्गीतून काढण्यात येणार आहे.
मिरवणूक पैलाडपासून ढेकू रोड कलागुरु जवळील पोलीस चौकीपर्यत सायंकाळी 5.30 वाजता ही मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यात समारोप होईल. ही मिरवणुक शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात येत आहे. बग्गीला सुंदर फुलांनी सजवले जाणार आहे. पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांचे प्रशासनातील उत्कृष्ट कार्य आणि जनतेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन, हा सन्मान सोहळा मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या मिरवणुकीत अनेक प्रमुख व्यक्ती तसेच स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. आयोजकांनी शहरवासीयांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.




