
अमळनेर:- शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेतून जिजाऊ आय.टी.आय टाकरखेडे येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी यावेळी बोलताना तालुक्यात राबवत असलेल्या योजना बाबत तसेच राज्य व केंद्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली मग त्यात लाडकी बहीण असेल बचत गटाच्या योजना असतील बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना असतील आधी सर्व योजनांबाबत माहिती दिली.
यावेळी जिजाऊ संस्थेच्या चेअरमन सुरेखा मधुकर पवार, टाकरखेडे चे सरपंच रामभाऊ, जेष्ठ शिवसैनिक प्रकाश पाटील,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, दूध डेअरी चेअरमन लक्ष्मण पाटील, वि.का.सो चेअरमन सुभाष पाटील , ग्रामसेवक अविनाश पाटील, प्रभाकर पाटील, पुरुषोत्तम पाटील, कंडारी खु चे सरपंच सत्तर पवार, ग्रा सदस्य आशाबाई पवार, मच्छिंद्र टेलर आदी उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसैनिक बापूजी पाटील, अक्षय पाटील, किरण पाटील, करण पाटील, सोनू पाटील, भूषण पाटील, बुधा पाटील यांनी मेहनत घेतली. मेळाव्याला कंडारी, लोणे, नगाव,पातोंडा, निमझरी , औरंगपुर, दहीवद येथील नागरिक उपस्थित होते.




