अमळनेर:- तालुक्यातील मारवड पोलिस ठाण्यातर्फे डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर डीवायएसपी सुनील नंदवाळकर, एपीआय जिभाऊ पाटील, पीएसआय विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डीवायएसपी नंदवाळकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डीवायएसपी नंदवाळकर यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत सांगितले की, “ज्याच्यात माणुसकी असते तेच पोलिस खात्यात नोकरी करू शकतात. माझ्या कार्यकाळात अनेक आव्हाने पेलताना चांगले सहकारी लाभल्याने मुख्य समस्यांवर लक्ष केंद्रित करता आले. मारवड पोलिस ठाण्याअंतर्गत परिसर शांत असल्याने व मी गणेशोत्सवात अमळनेरात लक्ष ठेवू शकलो. आधीच्या मानाने शहर संवेदनशील झाले असून ग्रामीण भागाकडे एपीआय जिभाऊ पाटील यांचे लक्ष असल्याने मी निश्चित होतो. ओळखी आणि ऋणानुबंध टिकवून ठेवल्याने कारकिर्दीतील अनेक आव्हाने पेलता आलीत”, असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास विकासो चेअरमन शरद साळुंखे, संचालक अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील, एन. एस. पाटील, पत्रकार डॉ. विलास पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, बापू बडगुजर, दाजभाऊ बडगुजर यांच्यासह मारवड पोलिस ठाण्यातील पीएसआय मंगला पवार, हेकॉ फिरोज बागवान, सुनील तेली, सुनील अगोने, संजय पाटील, मुकेश साळुंखे, सचिन निकम, मपोहेकॉ रेखा इशी, भरत इशी, चालक धनंजय देसले, पोकॉ भरत गायकवाड, प्रवीण पाटील, राजू पाटील, विनोद साळी, बशीर शेख आदी कर्मचारी उपस्थित होते.