अमळनेर :- कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून भाविकांची मोठी श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी होत असते. अमळनेर येथील भवानी माता मित्र मंडळाचे कार्यकर्ते व भाविक जवळपास २५० किलो मीटर अंतर पायी चालत पेटती अंखड ज्योत घेऊन दि. ३ ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेला पोहचले. या अखंड ज्योत पदयात्रेला नंदू पटिल तसेच नानू पाटील गावातील इतर नागरिकांनी मनोभावे निरोप दिला.
भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण…
नवरात्र महोत्सवात देशभरातून श्री सप्तशृंगी मातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. नवरात्रीत ही ज्योत
कुलस्वामिनीपासून नेण्याची महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्तगण धावत येत असतात. हीच परंपरा अमळनेर येथील देवीभक्त यंदापासून मनोभावे करीत आहे.वनी श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर ते अमळनेर २५० की. मी. अंतर तीन दिवसात भक्तगण पोहचले आहे. हे भक्त दररोज जवळपास ६० ते ७० किमी चालणार आहे. पायी ज्योत घेऊन धावणाऱ्यांमध्ये देवीभक्तांची निवड करतांना त्यांची प्रकृतीही पाहिली जाते. तो ज्योत घेऊन चालतांना प्रत्येकाला जास्तीतजास्त त्याला पाच किलोमीटर मर्यादा आखून देतात. या दरम्यान त्याला सावकाश धावायला सांगतात. चालतांना दम लागला, त्रास झाला तर त्याला आराम दिला जातो. पुढच्या तरुणाच्या हाती ज्योत दिली जात आहे. या धार्मिक उपक्रमामुळे सर्व भक्तांमध्ये धार्मिकतेचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असल्याचे दिसून येत आहे. भवानी माता मित्र मंडळाचे भाविक कार्यकर्ते पहिले वर्ष वणि गड येथून अखंड ज्योत आणण्याचा संकल्प मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला होता तो संकल्प पूर्णत्वास येत आहे. देवी शक्तिपीठ नाशिकच्या कुलस्वामिनी देवस्थानापासून अखंड ज्योत आणत असताना पायी नाशिक ते साकळी असा जवळपास २५० किलोमीटरचा लांब पल्ला पायी चालताना प्रत्येक भाविकांच्या मनामध्ये एक वेगळीच सात्विकता व भक्तिभाव निर्माण होत असतो. ज्योत घेऊन चालत असताना देवी माता एक वेगळीच शक्ती भक्तांना प्रदान करीत असल्याची प्रचिती येत आहे. अखंड ज्योत पदयात्रेमुळे शरीराला एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होऊन मन प्रसन्न होत आहे. अशी भावना मंडळाचे कार्यकर्ते जेष्ठ नंदू पाटील यांनी अखंड ज्योत पदयात्रेतून बोलतांना व्यक्त केली. या पदयात्रेदरम्यान सर्व भाविक कार्यकर्ते एकमेकाची काळजी घेत असून सर्व कामकाज शिस्तीच्या मार्गाने करीत आहे. त्याचप्रमाणे या पदयात्रेत साकळी येथील बालाजी वेफर संचालक कांतीलाल भोई व छोटू भोई या दोघांनी आपल्या मालकीचे एक चार चाकी वाहने मोफत उपलब्ध करून दिलेली असून सर्व भाविक भक्तांसाठी वाहनाची व्यवस्था करून देत आहे. ही या पदयात्रेतील विशेष कौतुकाची बाब ठरली आहे.
Related Stories
December 22, 2024