तालुका कृषी कार्यालयात जवखेडा येथील शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
अमळनेर:- अतिवृष्टी होऊनही पंचनामे करून प्रत्यक्षात शेतकरी वंचित मात्र लाभार्थी इतर जण असल्याने तालुका कृषी कार्यालयात जवखेडा येथील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले.
जून जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतजमीन आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याठिकाणी आर्डी अनोरे भागातील सर्व शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले. मात्र नुकसानभरपाई लाभार्थी इतर ज्यांचे आजही खरोखर नुकसान झाले ते वंचित राहिले आहेत, याची संबंधित विभागाने प्रत्यक्ष खात्री करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी होती. कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी शेतकऱ्यांना यादी तयार केली नाही अशीही ओरड होती. केवळ २०० जणांचे पंचनामे झाले त्यात १०० लाभार्थी ज्यांचे नुकसानच झाले नाही असे असल्याचे म्हणणे शेतकऱ्यांचे होते. यात अनेक खरोखर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी याठिकाणी मांडले.
जून महिन्यात अतिवृष्टी – जून महिन्यात झालेल्या दोन तीन झालेल्या अतिवृष्टीमुळे एकट्या जून महिन्यात १८९ मिमी पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात जमीन खरडली गेली. काहींच्या शेतीत गाळ साचला पिकांचे अतोनात नुकसान झाले मात्र पंचनामे आमचे झाले नसल्याचे शेतकरी म्हणत होते. प्रत्यक्ष शेतीत येऊन पंचनामे झाले नाहीत. मात्र ३३ टक्क्यांच्या वर नुकसान नसल्याचे प्रशासनाचे कर्मचारी सांगत राहिले. यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला होता.
तालुका कृषी अधिकारी नाशिकला
तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे हे नाशिक येथे बैठकीला गेले असल्याने कार्यालयात नव्हते. दुसरे कार्यालय कृषी अधिकारी अविनाश खैरनार हे मात्र आल्यानंतर व इतर कृषी सहाय्यक यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन तोडगा काढून येतो म्हणून तहसीलदार यांना विनंती करून शेतकर्यांसमोर या असे सांगितले. तहसीलदार यांनी मान्य करत कृषी कार्यालयात दाखल झाले. त्याठिकाणी तोपर्यंत शेतकरी ठिय्या मांडून होते. दरम्यान तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तालुका कृषी कार्यालयात येऊन उर्वरीत शेतकऱ्यांची यादी तयार करून सोमवारी द्या असे शेतकऱ्यांना सांगितल्याने ग्रामस्थांनी मान्य केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात पुरुषोत्तम पाटील, किरण पाटील, अनिल पाटील, हिंमत पाटील, प्रमोद पाटील, मुरलीधर पाटील, सुरेश पाटील, शरद पाटील, सुनील पाटील, विमलबाई पाटील, संगीता पाटील, निर्मला न्हावी, सुनीता पाटील यांच्यासह १५० जण याठिकाणी हजर होते.