अमळनेर:- पायाच्या पंजावरून डंपर गेल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी मंगलमूर्ती चौकात घडली.
अनिकेत पिसे,(राहणार आर के नगर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून तो आपल्या पत्नीसह दुचाकीवरून जात असताना अचानक मोठ्या डंपरजवळ त्याचा तोल गेल्याने तो खाली पडून डंपरचे एक चाक त्याच्या पंजा वरून गेले यामुळे तो जखमी झाला.त्यास इतरांनी उचलून तात्काळ अमळनेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.