
अमळनेर:- तालुक्यातील गांधली येथील रहिवाशी अतुल निंबाजी बाविस्कर हे २२ वर्षाच्या खडतर सेवे नंतर ३० नोव्हेंबर रोजी भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत, सेवानिवृत्त निमित्त ४ डिसेंबर रोजी गांधली गावातून, वाजत गाजत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.


यावेळी बाविस्कर यांचा संपूर्ण परिवार नातेवाईक, ग्रामस्थ आणि सेवानिवृत्त सैनिकांची सुरक्षा रक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तत्पूर्वी अमळनेर रेल्वे स्थानकावर देखील अतुल यांचे भव्य स्वागत करण्यात आले, अतुल बाविस्कर यांचे सरपंच नरेंद्र पाटील, महेंद्र पाटील, रिता ताई बाविस्कर यांनी स्वागत केले तर खासदार स्मिता वाघ यांनी देखील शुभेच्छा दिल्या
अतुल बाविस्कर यांचे लहान बंधू राहुल पाटील हे देखील भारतीय सैन्य दलाच्या सेवेत आहेत, मोठा भाऊ सेवानिवृत्त झाला असला तरी,लहान भाऊ मात्र बॉर्डर वर आपले कर्तव्य बजावत राहणार आहे.

