फटाक्यांच्या आतिषबाजीने वेधले लक्ष,मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत रावण दहन
अमळनेर -विजया दशमीला रुबजी नगर येथील दसरा मैदानावर रावण दहन पाहण्यासाठी व सीमोल्लंघन करण्यासाठी यंदा प्रचंड गर्दी उसळली होती,यावेळी अवककाशात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने सर्वांचेच लक्ष वेधले.मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राम लक्ष्मणच्या हातून अग्निबाण मारून रावण दहन करण्यात आले.
पवनपुत्र व्यायाम शाळा,भोई वाडा व माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे मित्र परिवार यांनी सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी अध्यक्षस्थानी मंत्री पाटील तर मंचावर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे,पोलीस निरीक्षक विकास देवरे,माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर,मार्केट सभापती अशोक पाटील ,माजी नगरसेवक सोमा महाजन, समाजसेवक योगेश गोविंदा महाजन,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, प्रविण बारकु महाजन,फोटोग्राफर असोसिशनचे महेंद्र पाटील,गंगाराम महाजन,बापू झुलाल पाटील,तुळशीराम महाजन,विठोबा महाजन,गणेश महाजन यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राम आणि लक्ष्मण यांची सजीव आरास साकारण्यात आली होती.सजावट केलेल्या रथातून प्रतीकात्मक राम उमेश महाजन व प्रतीकात्मक लक्ष्मण दादू भोई यांची विजय मारुती मंदिरापासून वाजगाजत मिरवणूक काढून ही मिरवणूक दसरा मैदानावर दाखल झाल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीराम व लक्ष्मण यांचे पूजन व सत्कार करण्यात आला.मंत्री अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.यानंतर भव्य आतिषबाजी झाल्यानंतर श्री रामांच्या हस्ते रॉकेट रुपी अग्निबाण सोडून रावणाच्या भव्य प्रतिमेचे दहन करण्यात आले.रावण दहन होताच जय श्रीराम यांचा प्रचंड जयघोष होऊन उपस्थित सारे सोने लुटण्यासाठी मार्गस्थ झाले.सूत्रसंचालन दिनेश शेलकर यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वितेसाठी विनोद लांबोळे यासह मित्र पवन पुत्र व्यायाम शाळेच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले.