अमळनेर:- तालुक्यातील निम येथील विविध कार्यकारी सोसायटी संस्थेच्या चेअरमनपदी छोटू पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी छोटू ताराचंद पाटील यांची चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली व व्हाईस चेअरमन पदी श्रीमती सखुबाई भगवान चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मगन वामन पाटील, बळीराम रामकृष्ण चौधरी, प्रवीण कुमार गोरखनाथ चौधरी, पंढरीनाथ भाऊलाल चौधरी, नामदेव प्रताप पाटील, हिलाल छन्नु सैंदाणे, आनंदा खंडू धनगर श्रीमती भारती राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.सर्व कामकाज अमळनेर ए आर ऑफिसचे पाटील व सचिव दिलीप भाऊसाहेब यांनी पाहिले.