अमळनेर:- तालुक्यातील शहापूर येथील १८ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना १५ रोजी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहापूर येथील भोलेनाथ समाधान भील (वय १८) हा आईवडिलांसोबत राहून बकऱ्या चारण्याचे काम करीत असे. १५ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भोलेनाथ याने शहापूर शिवारातील नाल्याकाठी असलेल्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यास उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ देविदास ईशी हे करीत आहेत.