अमळनेर:- तालुक्यातील डांगरी गावाजवळील बोरी नदीच्या पात्रात ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
१४ रोजी ही घटना उघडकीस आली असून सदर मृतदेह खापरखेडा येथील बापू दौलत भील यांचा असल्याचे समोर आले आहे. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी पसरली होती. डॉ. आशिष पाटील यांनी जागीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी नाना पवार यांच्या खबरीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.