
मात्र तिच्याच विवाहित बहिणीशी लग्न केल्याने एकावर अत्याचार व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवत तिचा गर्भपातही केला आणि तिच्याच विवाहित बहिणीशी लग्न केल्याने एकावर अत्याचार व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका मागासवर्गीय पीडितेने दिलेली फिर्याद अशी की, ती पुणे येथे राहत असून तिने जळगाव येथील प्रसाद बोरसे याच्याशी प्रेमसंबंधातून लग्न केले होते. त्याच्याशी भांडण होत असल्याने तिने घटस्फोट घेतला. ती अधून मधून अमळनेर येथील तिच्या मोठ्या बहिणीकडे येत होती. ती ज्याच्या घरात राहत होती तेथील रत्नाकर सुभाष पाटील (रा अमळनेर) याच्याशी तिचे प्रेम संबंध जमले. ते एकमेकांना भेटत होते. रत्नाकर ने तिला नोकरी लावून देईल व लग्न करेल असे आश्वासन दिले होते. आणि आई आजारी असल्याचे कारण सांगून एक लाख रुपये मदत म्हणून मागितले होते. पीडितेने त्याच्याकडे एक लाख रुपये परत मागितले असता त्याने परत केले नाहीत. त्याचवेळी पीडिता गर्भवती होती. रत्नाकरने तिला गर्भपात करायला सांगितले. गर्भपात केल्यानंतरही तो लग्न करण्याचे आश्वासन देत होता. मात्र नंतर त्याने पीडितेच्या मोठ्या बहिणीशीच लग्न करून घेतले. पीडिता त्याला जाब विचारायला गेली व पैशांची मागणी केली असता त्याने दोन महिन्यात देतो म्हणून सांगितले मात्र आजपर्यंत पैसे दिले नाही. पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रत्नाकरने पीडितेला घरातून हाकलून दिले. पीडितेच्या फिर्यादीवरून रत्नाकर यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला बलात्कार व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अमळनेरचे प्रभारी व चोपड्याचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप करीत आहेत.




