
भाविकांचा लाभतोय प्रचंड प्रतिसाद
अमळनेर:-येथील शिरूड नाका भागातील शिवाजीनगर परिसरामध्ये जय हिंद व्यायाम शाळे जवळ ओंकारेश्वर मंदिराच्या सानिध्यात भव्य संगीतमय शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला आहे.
कृष्णकृपा प्रेममूर्ती दिलीपजी महाराज,जळगाव कर यांच्या अमृत वाणीतून ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे.कथेस 17 ऑक्टोंबर पासून प्रारंभ झाला असून 23 ऑक्टोबर पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे. कथेची वेळ दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजे शिवाजी मित्र मंडळ,छत्रपती शिवाजीनगर, जयहिंद व्यायाम शाळा यांनी केले आहे.




