
नागरिकांचे आरोग्य धोक्यात, भुयारी गटारींचा नागरिकांना ताप
अमळनेर:- शहरातील तलाठी कॉलनीत अशुद्ध फेसाळ पाणी येत असल्याने यातून भुयारी गटार मुळे नळांना दूषित पाणी पुरवठा होत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काम पाणीपुरवठा सुरळीत होत असतांना वास्तविक पाहता हा आरोग्याचा प्रश्न असून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. चार दिवस पुरेल इतके अशुद्ध पाणी साठवुन कसे ठेवावे ही चिंता आता नागरिकांना पडली आहे. नळांना फेसाळयुक्त पाणी येत असून गटारीच्या पाण्यासारखा कुबट वास येत आहे. याकडे पालिकेने पाणी ही जीवनावश्यक बाब असून नागरिकांना विविध आकारांची लागण होऊ शकते. या बाबीकडे पालिकेने गंभीरपणे घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. दूषित पाणीपुरवठ्याचा स्रोत शोधण्याचे काम हाती घेतला पाहिजे, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्व्ह एकाच ठिकाणी असल्याने गळती लागलेल्या वाहिन्यांद्वारे सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत मिसळत असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. ढेकूरोड वर कोणत्या भागात भुयारी गटारीच्या पाणी लिक आहे याचा शोध घेतल्यास गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे याचे कारण समजेल. याबाबत तक्रार पालिकेकडे केली असून रहिवाशांनी याप्रकरणी पालिकेने दिरंगाई केली तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रतिक्रिया…
कदाचित भुयारी गटारीमुळे कुठेतरी पाणी लिक असावे म्हणून हे येत असावे असा अंदाज आहे. लिक बाबत योग्य ती कार्यवाही तातडीने केली जाईल व पाणीपुरवठा योग्य केला जाईल- प्रवीण बैसाणे, पाणी पुरवठा अभियंता.




