
अमळनेर : शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागून घरातील वस्तू जळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश मिळाले आहे.
जितेंद्र जगन्नाथ धनगर रा प्लॉट नंबर २३ राजाराम नगर हे गल्लीतील महादेव मंदिरावर आरतीसाठी गेले होते. आरती संपल्यावर गल्लीतील पंकज कैलास पाटील यांनी येऊन सांगितले की तुमच्या घराला आग लागली आहे. मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळवल्यावर त्यांनी अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे याना अग्निशमन बंब पाठवण्याचे आदेश दिले.फारुख शेख , उस्मान , योगेश कंखरे यांनी आग विझवली. घरातील फ्रीज ,लाकडी देव्हारा , कपाटातील १५ हजार रुपये रोख , फ्रिजवर ठेवलेली १३ ग्राम वजनाची सोन्याची माळ , भांडी कुंडी , संसारोपयोगी साहित्य असा सुमारे दीड लाखाचे साहित्य जळून खाक झाले. जितेंद्र धनगर यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




