
अमळनेर : रात्रीची गस्त घालत असताना अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडल्याची घटना २४ रोजी पहाटे १२ वाजून ४० मिनिटांनी घडली.
उज्वलकुमार म्हस्के आणि योगेश सोनवणे रात्री गस्त घालत असताना त्यांना भावेश वासुदेव महाले वय २० रा संताजी चौक माळीवाडा हा तरुण बिना नंबरचा टेम्पोमध्ये अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.

