अमळनेर:- अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी २४ ऑक्टोबर बुधवारी ५ उमेदवारांकडून १२ नामनिर्देशन पत्र घेण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन दिवसात एकूण २९ उमेदवारांकडून ६८ नामनिर्देशन पत्र घेण्यात आलेले आहेत. २४ रोजी २ अर्ज दाखल करण्यात आले असून मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर माजी जी.प.सदस्य शिवाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.