अमळनेर:- येथील रोटरी क्लब आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एच. आय. व्ही.सह जगणाऱ्या बालकांना
सकस आहार किराणा किट, प्रोटीन किट व दिपावली फराळाचे वाटप करण्यात आले. यासाठी शहरातील काही दात्यानी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर 22500/- रुपयांचा किराणा देवु केला व दिपावलीचा फराळ शहरातील स्वादिष्ट नमकीनचे मालक निलेश पाटील व त्यांचे सहकारी पप्पू पाटील यांनी दिला तसेच रोटरीयन अनिल शहा व रंजनबेन शहा यांच्याकडून प्रोटीन किट देण्यात आले
रोटरी हॉल येथील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल शहा होते व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भारती पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती किरण ताई, (संग्राम संस्था सांगली) व माधुरीताई (प्रेरणा संस्था यवतमाळ) यांची उपस्थिती होती. श्रीमती किरण या स्वतः एच आय व्हीं सह तीस वर्ष जीवन जगत आहेत, त्यांनी एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना याच्या विषयी जगण्याची हिंमत कशी निर्माण करावी यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद व रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला, विवेक देशमुख, कीर्ती कुमार कोठारी,प्रतीक जैन,अभिजीत भांडारकर ,राजेंद्र जैन ,देवांग शहा ,रोनक संकलेचा,प्राचार्य डॉ .दिलीप भावसार यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी आधार बहुउद्देशीय संस्थेचे टीम मेंबर राकेश महाजन, मुरलीधर बिरारी ,पुनम पाटील,दीप्ती शिरसाट, दीपक विश्वेश्वर, तौसिफ शेख परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन संजय कापडे यांनी केले.