
अमळनेर– तालुक्यातील टाकरखेडा गावात मृत्यूनंतर वृक्ष लागवडाचा समाजोपयोगी उपक्रम टाकरखेडा येथील जाधव परिवाराने सुरू केला आहे.

कै.ग. भा. गंगुबाई आसाराम पाटील व कै.ग. भा .गुंताबाई छबिलाल पाटील यांच्या अंत्यविधीनंतर व दशक्रिया गंधमुक्ती दरम्यान स्मशानभूमीत वृक्ष लागवड करण्यात आली. गावातील जाणकार मंडळींकडून चर्चेत ठरले की, अस्थी व राख नदीत टाकुन नदीचे पाणी दुशीत करण्याचे टाळावे. त्यापेक्षा गावात कोणाचाही मृत्यू झाला तर मृत्यूनंतर कमीत-कमी एक वृक्ष लागवड करुन त्यात अस्थी व राख टाकुन माती टाकावी. वृक्ष संगोपनाची जबाबदारी त्यांच्या वारसदारांची असेल. पर्यावरण संतुलन राखण्याकामी सारे एकजुट होवून कार्य करण्याचा निर्णय टाकरखेडा वाशियांनी घेतला. याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी उपसभापती पूनम भटू पाटील, सरपंच रामदास रूपशिंग भिल्ल, निवृत रेल्वे गार्ड नंदकिशोर पाटील, जगदीश पाटील, दशरथ पाटील,भगवती मेडिकलचे संचालक भाऊसाहेब पाटील, अर्जुन पाटील, जितेंद्र पाटील, भटू आबा, अजबराव जाधव, अशोक जाधव, जगन्नाथ पाटील, भिकन बारकु पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




