
अमळनेर:- संपूर्ण जळगाव जिल्हा कार्यक्षेत्र असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी अमळनेर शहरातील विठ्ठल नगर भागातील रहिवाशी मुख्याध्यापक आशिष पुंडलिक पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुख्याध्यापक पवार हे अमळनेर शहरातील बहादरपूर रोड भागातील समता युवक कल्याण केंद्र संचलित प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक आहेत तसेच पातोंडा येथील रहिवासी आहेत. पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याने मुख्याध्यापक पवार यांचे पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी अभिनंदन केले तर साने गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पवार यांचे अभिनंदन केले




