
अमळनेर -डी.आर.कन्या शाळेत भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा नुकतीच पार पडली.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा संपन्न झाली. उपमुख्याध्यापक विनोद कदम, पर्यवेक्षिका सौ बाविस्कर यांनी मुलींना प्रोत्साहन दिले.श्रीमती पी.एस कोतकर, श्रीमती दाभाडे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. तसेच गायत्री शक्तीपिठाकडून घेण्यात आलेली ही भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा यांचे आयोजक श्री सोनवणे यांनी सुद्धा सहकार्य केले. सकाळ व दुपार विभागात ही परीक्षा घेण्यात आली. श्रीमती प्रतिभा साबे, सौ. पी .एस. सराफ, ज्येष्ठ शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर बंधू भगिनी यांच्या सहकार्याने ही परीक्षा पार पडली.




