
अमळनेर:- शहरातील ढेकू सिम रस्त्याची भुयारी गटारीच्या कामामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे,भुयारी गटारीची काम ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात केल्याने या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले.

पावसाळा संपला तसे भुयारी गटारीचे काम देखील संपले आहे मात्र रस्त्यावर मातीचा थर साचलेला असल्याने अवजड वाहन गेल्यावर रस्त्यावर प्रचंड मातीचे लोट उठत आहेत, तर रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे असल्याने वाहन चालकांना मणक्याचे त्रास होत आहेत,ढेकू रस्त्यावर ये जा करणाऱ्या प्रत्येकाचे हाडे खिळखिळी झाले आहेत, पावसाळा असताना भुयारी गटारीची काम करण्यात तत्पर असणाऱ्या ठेकेदारांने गटारीचे काम झाल्यावर रस्ता पूर्वरत करण्यात तत्परता दाखवला हवी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सदर रस्ता पूर्वरत करून दिल्यास रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन यांनी सांगितले आहे.




