
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथे लवकर चिकन न दिल्याने एकाने लोखंडी रॉडने चिकन विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी घडली आहे.

फारुख अल्लाउद्दीन खाटीक (रा शिरसाळे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास झाडी येथे फिर्यादी चिकन विक्री करत असताना गावातील किरण वैभव पाटील हा आला आणि फारुख लवकर चिकन दे असे म्हणू लागला. त्यावर फिर्यादी याने आधी आलेल्या लोकांना चिकन देतो नंतर तुला देईल असे सांगितले. मात्र असे बोलण्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतो असे विचारले असता त्याने लोखंडी रॉड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर मारले. त्यावेळी गावातील लोकांनी फिर्यादीची सोडवणूक केली. माझ्या नादी लागला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्याने यावेळी दिली. फिर्यादीने उपचार घेवून मारवड पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.

