
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली येथे ५५ वर्षीय इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी घडली आहे.

भिलाली येथील जयसिंग नत्थु राजपूत( गिरासे) यांनी राहत्या घरात वरच्या मजल्यावर रुममध्ये पंख्याला सुती दोरीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. गावातील लोकांनी त्यांना उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.

