अमळनेर:- उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीच्या दिवशीच प्रथमेश शिरीष चौधरी या अपक्ष उमेदवाराने स्वतः अर्ज देऊन माघारी घेतली आहे. १६ पैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता फक्त १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
प्रथमेश चौधरी हा माजी आमदार व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा पुत्र आहे. माघारी घेण्यासाठी ४ नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत असली तरी माघारीसाठी फक्त एकच दिवस उरला आहे. ३१ रोजी एकही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. तसेच शुक्रवारी दिवाळीची सुट्टी, शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने फक्त सोमवारी ४ तारखेला एकच दिवस माघारीसाठी उरतो. मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज असल्याने त्या अनिल पाटलांसाठी माघार घेण्याची शक्यता आहे.
एका बॅलेट युनिटवर१५ उमेदवार आणि एक नोटा असे १६ उमेदवारांचे नावे बसतात म्हणून अमळनेर विधानसभा मतदार संघात एकच बॅलेट युनिट असेल अशी माहिती नितीन मुंडावरे यांनी दिली.