अमळनेर:- विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, प्रलोभनाला व जातीपातीच्या राजकारणाला, दबावाला बळी न पडता मतदान व्हावे म्हणून शाळांचे शिक्षक गावात जाऊन विद्यार्थी व पालकांचे त्यांच्या घरी जाऊन संकल्प पत्र भरून घेत आहेत.
अमळनेर तालुक्यात ५ वी ते १२ वी एकूण ५२ हजार विद्यार्थी आहेत. शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्याने विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत नव्हते. मात्र निवडणूक कामासाठी शिक्षकांना संकल्प पत्र भरून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने. शिक्षकांनी गावात जाऊन जनजागृती रॅली काढली तसेच विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून संकल्प पत्र भरून घेत त्यांच्या सह्या घेतल्या.
तालुक्यातील मंगरूळ येथे स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्रकाश पाटील ,अशोक सूर्यवंशी,प्रभूदास पाटील, संजय पाटील , सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण, सीमा मोरे, वस्ती शाळेचे भटू पाटील, सचिन अहिरे, चंद्रशेखर पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील , ग्रामसेवक संजीव सैंदाणे, तलाठी ए बी सोनवणे, प्राथमिक शाळेचे उषा भदाणे, नीलम चौधरी, सोमनाथ विसपुते, गोपाळ सर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वासुदेव पाटील, रवींद्र पाटील, कोतवाल भटू पाटील यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे तसेच प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले.