
अमळनेर:- क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय टेनिस स्पर्धा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे आणि एरंडोल विभागाचे टेनिसपटू सहभागी झालेले होते. आंतरविभागीय टेनिस स्पर्धेमध्ये प्रताप महाविद्यालयाच्या संघाने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले .
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर चे टेनिस खेळाडू चि . रोहित पाटील (S.Y.B.A.), कु. स्नेहल पाटील (F.Y.B.COM) यांनी विजेतेपद फटकावले. दोन्ही टेनिसपटूंची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ टेनिस स्पर्धेसाठी स्तुत्य अशी निवड झाली. या उतुंग यशाबद्दल खा. शि. मंडळ अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरी पाटील, जितेंद्र देशमुख, विश्वस्थ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भीका वाणी,संचालक योगेश मुंदडा, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, ज्येष्ठ संचालक विनोद पाटील, कल्याण पाटील खा. शि. मंडळ सचिव व प्राचार्य डॉ. अरुण बी.जैन, सहसचिव व अधिसभा सदस्य डॉ. धीरज वैष्णव , उपप्राचार्य प्रा.डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, प्रा. डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे, वरिष्ठ जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, डॉ. मुकेश भोळे, क्रीडा संचालक प्रा.डॉ.सचिन पाटील,प्रा. अमृत अग्रवाल, प्रशिक्षक प्रा.विजय शिंदे, कुलसचिव राकेश निळे, क्रीडा शिक्षिका प्रा.अर्चना सचिन पाटील, प्रशांत देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू यांनी स्नेहल पाटील आणि रोहित पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

