अमळनेर : अमळगाव शिवारात झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी तपासात दीपक प्रल्हाद पवार व सुमित संतोष संदानशिव या दोघांची नावे निष्पन्न केली आहेत. आरोपींची संख्या आठ झाली असून आठही आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विकास प्रवीण पाटील याच्या खून प्रकरणात एलसीबी पोलीसानी अमोल वासुदेव कोळी , मनोज हनुमंत श्रीगणेश , कमलाकर हनुमंत श्रीगणेश , नितीन दिनकर पवार , हर्षल नाना गुरव याना अटक करून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांनतर मारवड पोलिसांनी फरार आरोपी रोहित सीताराम पाटील याला देखील ताब्यात घेतले. चौकशीमध्ये दिपक पवार व सुमित संदानशीव यांचीही नावे समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांनी सर्व आठही आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्या एस एस जोंधळे यांनी आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.