विकाऊ कर्मचारी आणि विकत घेणाऱ्या उमेदवारांची गोची…
अमळनेर : निवडणूक आयोगाने निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणल्याने पोस्टल बॅलेटचा सौदा बंद होणार आहे.
पूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट घरी देण्यात येत होते. त्यामुळे काही कर्मचारी पाकीट घेऊन उमेदवाराच्या घरी जाऊन त्या मताचा सौदा करत असे. एक हजार ते २ हजाराला मत विकले जायचे. काही कर्मचारी तर कोरे पाकीट उमेदवाराकडे देऊन यायचे. त्यामुळे त्या मतपत्रिका दाखवून इतरांचेही मन वळवले जायचे.
ही सौदेबाजी थांबवून पारदर्शी मतदान होण्यासाठी आयोगाने आता एक इडिसी पद्धत काढली असून एकाच मतदार संघात निवडणूक ड्युटी असेल तर त्या मतदान केंद्रावर मतदान करता येत होते. अन्यथा कर्मचाऱ्याला आता प्रशिक्षणाच्या ठिकाणी किंवा साहित्य घेताना मतदान करता येणार आहे. आणि कर्मचारी विविध मतदार संघात ड्युटीला जाणार असल्याने मतांचा बाजार होणे अवघड आहे. निवडणूक अधिकाऱ्यांसमोर प्रतिज्ञापत्र भरणे आणि अधिकाऱ्यांसमोर हे सर्व करावे लागणार असल्याने विकाऊ कर्मचाऱ्यांची तर विकत घेणाऱ्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे सौदेबाजीला आळा बसणार आहे. दोन्ही कडून पैसे घेऊन मते बाद होण्याचे प्रमाण देखील थांबणार आहे.