अमळनेर : तालुक्यातील सुंदरपट्टी येथील ७१ वर्षीय इसमाने मतदान केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मतदान केंद्राबाहेरच मृत्यू झाल्याची घटना घडली. व्यस्त कालावधीत देखील मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या मतदारांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली होती.
मधुकर संतोष पाटील (वय ७१) रा सुंदरपट्टी यांना मुलगा नाही , पत्नी मयत आहे तर दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. ते गलवाडे रस्त्यावरील योगेश पाटील यांच्या ओम साई टी कंपनीत राहून तेथेच काम करीत होते. २० रोजी त्यांना मतदानासाठी रिक्षाने सुंदरपट्टी येथे आणले. मतदान कक्षात जाऊन मतदान केल्या नंतर बाहेर आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. म्हणून केंद्राबाहेर त्यांना खाली बसवण्यात आले. जवळच्या लोकांनी त्यांना पाणी पाजून थोडे चालून पुढे नेल्यावर त्यांचा झाडाखाली मृत्यू झाला. २१ रोजी सकाळी त्यांची अंत्ययात्रा झाली. त्यांच्या नातूने त्यांना अग्निडाग दिला. योगेश पाटील ,प्रेमराज पाटील यांच्यासह काही जणांनी त्यांच्या उत्तरकार्याला आर्थिक मदत दिली.