अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात २३ रोजी श्री कालभैरव यागचे आयोजन केले असून पूजनाचे विविध क्षेत्रातील नऊ मानकरी असणार आहेत.मंदिरात श्री कालभैरवजी व माता भैरवी देवी यांच्या मूर्तींची यावर्षीच प्राणप्रतिष्ठा झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्री कालभैरव यागाचे हे पहिलेच वर्ष आहे.
धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संचलित श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी १२ वाजेपासून श्री कालभैरव याग होणार असून डॉ. उदय अहिरराव, भुसावळचे मिलिंद टोके, चंद्रकांत भानुदास भदाणे, सूरज सराफ, हितेशभाऊ तांबट, हिरानंद जेऊमल पंजाबी, हरिओम हिरानंद पंजाबी, अशोक एकनाथ सूर्यवंशी, स्टॅम्पवेंडर बाबा देशमुख, गोपाल टेन्ट हाऊसचे संचालक गोपाल कुंभार हे पूजनाचे मानकरी असणार आहेत.
दुपारी २.३० ते ३.१५ दरम्यान फराळ व चहापानाचा मध्यांतर होईल. त्यानंतर पुन्हा पूजा सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजेच्या आरतीनंतर यागाची सांगता होईल.