अमळनेर:- मारवड पोलीस स्टेशनचा लँड लाईन फोन 244233 अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
तातडीच्या कामाला अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जर पोलीस स्टेशनचा क्रमांक लागणार नाही तर नागरिकांना वेळेवर न्याय कसा मिळेल. टेलिफोन विभागाला दोन तीनदा तक्रारी केल्या असून तशी स्टेशन डायरीला देखील नोंद घेतली आहे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीभाऊ पाटील यांनी सांगितले. टेलिफोन विभागाने जनतेच्या सुरक्षेसाठी त्वरित फोन दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.