
अमळनेर:- तालुक्यातील लोण बु येथील ग्रामपंचायतीत जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी दिव्यांग बंधुंचा सत्कार करण्यात येवून त्यांना ग्रामपंचायत निधीतून 5% खर्चातून सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी लोण ग्रामपंचायतीचे प्रशासक राजेंद्र सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, लोण बु गावाचे मा.सरपंच कैलास भगवान पाटील, ग्रामरोजगार सेवक यशवंत बंडु पाटील, मनोहर हरिश्चंद्र पाटील, भानुदास बाबुराव पाटील, साहेबराव विठ्ठल पाटील, संजय मोहन महाजन, गणेश भानुदास पाटील व ग्रा.प.कर्मचारी दत्तु बाबुराव खैरनार कार्यक्रमास हजर होते.




