अमळनेर:- महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ॲग्रोवल्ड ही संस्था काम करते या संस्थेच्या माध्यमातून गेलो नऊ वर्ष जळगाव येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे शेती विषयक स्टॉल तर असतातच परंतु जिल्ह्यातील बरोबरच उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, गटांना ॲग्रोवल्ड पुरस्कार देवून सन्मानित करत असते.
फार्मर कप स्पर्धेत काम करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील धरती माता महिला शेतकरी गट, पिंपळे खु. आणि शंभू महिला शेतकरी गट, खोकरपाट या दोन गटांना राज्यस्तरीय पुरस्कार खासदार स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पिंपळे येथील लोकनियुक्त सरपंचा वर्षा युवराज पाटील यांनी देखील सर्व महिला सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.