अमळनेर:- तालुक्यातील रुंधाटी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी ५ डिसेंबर पासून ग्रामस्थ व समस्त भजनी मंडळ यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ झाला आहे.
5 रोजी हभप गोपाल महाराज उंदीर खेडे यांचे कीर्तन पार पडले. त्यानंतर हभप सुशिल महाराज विटनेर, हभप अतुल महाराज नारणे, हभप प्रतिभाताई सोनगीर, हभप कु मोहिनी ताई बाल कीर्तनकार, ह भ प किर्ती ताई महाराज चोपडा, ह भ प योगेश जी महाराज धामणगाव, यांचे कीर्तन होणार आहेत. दि. १२ रोजी रोजी ह भ प योगेश जी महाराज धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तनाने सांगता होईल व महाप्रसाद कै राजेंद्र पुजु पवार यांचे स्मरणार्थ श्री सचिन राजेंद्र पवार यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे.