
शेवटी सत्याचा विजय झाल्याची रवि पाटील यांनी दिली प्रतिक्रिया…
अमळनेर:- शहरातील विद्या विहार कॉलनी भागात झालेल्या वादात स्थानिक राजकारणामुळे गुन्हा दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

शहरातील मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांचे सुपुत्र रविंद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील यांच्यावर एका वादातून राजकीय कटकारस्थानांना सामोरे जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण न्यायव्यवस्थेने त्यांची यातून निर्दोष मुक्तता केली. 12 मे रोजी, विद्या विहार कॉलनीच्या कमानी जवळ धिंगाणा घालून काही लोकांनी आपसात भांडण सुरू केले. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी रवि पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादाचा फायदा विरोधकांनी घेत रवि पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करत त्यांना राजकारणातून बाजूला सारण्यासाठी त्यांना बदनामीचा कट रचला. मात्र 5 डिसेंबर 2024 रोजी न्यायमूर्ती एस.एस. जोंधळे प्रथम वर्ग न्यायालय अमळनेर यांनी रविंद्र पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे प्रभागातील नागरिक, महिलामंडळ, आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.
शेवटी सत्याचा विजय झाला- रवी पाटील
या निर्णयावर रवी पाटील यांनी सांगितले की, माझ्या सोबत दैव शक्ती व प्रभागातील नागरिकांचे आशीर्वाद आहेत. खोट्या गुन्ह्यांचा आणि अकारण आरोपांचा सामना करण्यात मी कधीही घाबरलो नाही. सत्य परेशान हो सकता है पराजीत नहीं. तसेच प्रभागातील जनतेच्या सेवेला कधीही खंडित होऊ देणार नाही “सत्यमेव जयते” या सिद्धांतावर विश्वास ठेवून नवीन राजकीय इनिंगमध्ये अधिकाधिक जनसेवेची कामे हाती घेतली जातील. न्यायालयाने केलेल्या निर्दोष मुक्ततेमुळे प्रभागातील समर्थक नागरिकांमध्ये विश्वास वाढवला असून भलेही राजकारणात विरोधक कितीही डाव साधत असले तरी सत्याचा अंतिम विजय होत असल्याचा विश्वास रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे.




