
अमळनेर – तालुक्यातील खवशी येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि समस्त ग्रामस्थ खवशी यांच्या अनमोल सहकार्याने 9 ते 15 डिसेंबर दरम्यान गुरुचरीञ पारायण सप्ताह आयोजित करण्यात आले आहे.

पारायण वाचन करण्यासाठी 56 महिला व पुरुष सेवेकरी बसले आहेत. दररोज सकाळी 4 ते 6 गुरुचरीञ वाचन, 6 ते 6:30 भूपाळी आरती, नित्यसेवा वाचन, सकाळी 10.30 नैवेद्य व संध्याकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती व नित्य सेवा वाचन होत आहे. गुरुचरीञ पारायणाचे हे 15 वे वर्ष आहे. विशेष म्हणजे 15 वर्षांत गुरुचरीञ पारायण वाचण्याच्या वेळेत थोडाही बदल झाला नसुन 15 वर्षापासुन कितीही थंडी असली तरी गुरुचरीञ पारायण वाचन दररोज सकाळी वेळेवर अगदी 4 वाजताच सुरू होते हे विशेष. सदरील पारायण हे गावाच्या दत्त मंदिराच्या बाजुच्या पटांगणात ग्रामपंचायत समोर भव्य मंडप टाकुन होत आहे. 15 डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी 12:39 वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करून महाप्रसादाचा कार्यक्रम होवुन पारायणाची सांगता होणार आहे. महाप्रसादाचे मानकरी खवशी येथील सूर्यकांत विनायक पाटील व सौ.सुनिता सूर्यकांत पाटील हे आहेत. कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.




